सोलापुर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. कार्तिकी यात्रेची पाहणी करून पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आढळला. त्यामुळे वैमानिकाने खबरदारी घेत उड्डाण रद्द केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्तेमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
नाशिक महापालिकेचा थकबाकीदारांना दिलासा ! मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीत मिळणार सवलत, 1 डिसेंबरपासून अभय योजना
नाशिक : मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नाशिककरांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्तीच्या रकमेत सवलत ...
टेक-ऑफपूर्वीच वैमानिकाच्या लक्षात आला बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी यात्रेची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने पुढील प्रवास करणार होते. मात्र, उड्डाणापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड आला. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता वैमानिकाने उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला.
शिंदे कारने पुण्याच्या दिशेने रवाना
हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर एकनाथ शिंदे रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती शिवसेनेचे अमोल शिंदे आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
यापूर्वीही हेलिकॉप्टरमध्ये बिघाडाच्या घटना
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये यापूर्वीही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुजरात दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले होते.
तसेच, मुंबईहून मुरबाडला जात असताना खराब हवामान आणि धुळीच्या वादळामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या वेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने वळवले होते.
पंढरपूरमधील ताज्या घटनेनंतर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर दिलासा मिळाला.