Pushpa 2 On OTT : ‘पुष्पा 2’ आता OTTवर रिलीज होणार

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' चित्रपटाने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. पुष्पा २ नं आपल्या दमदार यशानं भारतातील अनेक मोठमोठ्या आणि दिग्गजांच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.'पुष्पा २'ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

१० दिवस उलटले तरी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थिएटरनंतर आता अभिनेत्याच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा २च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.




'पुष्पा २' चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला आहे. आता चाहत्यांना चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता लागली आहे. 'पुष्पा २' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने २७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत 'पुष्पा २' चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार,अल्लू अर्जुनचा पुष्पा २ पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ९ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'पुष्पा २' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांचा समावेश आहे.मात्र चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप अधिकृतरित्या ओटीटी रिलीज संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. सहसा, कोणताही चित्रपट चित्रपटगृहांनंतर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी ४० ते ५० दिवस लागतात.मात्र हा चित्रपट रिलीजच्या आठ ते दहा आठवड्यांनंतर ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. असे बोले जात आहे. त्यामुळे 'पुष्पा २' हा ॲक्शन चित्रपट २०२५ मध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येणार आहे.

अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ मध्ये पुष्पराजच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व लोकांच्या अभिनयाचे चित्रपटात खूप कौतुक होत आहे. पुष्पा २ चे बजेट जवळपास ५५० कोटी रुपये आहे. अवघ्या ३-४ दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.पुष्पा २ने १२ दिवसांत १४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुष्पा २चे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर चित्रपटाने बजेटच्या जवळपास तिप्पट वसुली केली आहे आणि त्यातील एक मोठा भाग हिंदी आवृत्तीतून आला आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’