Champions Trophy 2025: ८ संघ, १५ सामने, जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल सर्व काही

मुंबई: पुढील वर्षी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ख्रिसमच्या ठीक एक दिवस आधी मंगळवारी हे वेळापत्रक जाहीर केले.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आधीच स्पष्ट केले होते की भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. अशातच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत होईल. आयसीसीने या स्पर्धेसाठी चार ठिकाणे ठरवली आहेत. एक ठिकाणी यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे. यात भारतीय संघ सर्व सामने खेळणार आहे.



भारतीय संघाचा दुसरा सामना पाकिस्तानशी


चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात १९ फेब्रुवारीपासून होत आहे. तर खिताबी सामना ९ मार्चला खेळवला जाईल. सुरूवातीचा सामना १९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये होईल. भारतीय संघ आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार हे. तर भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. हा सामना २३ फेब्रुवारीला यूएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.



भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये ८ संघादरम्यान १५ सामने रंगतील. सर्व संघांना २ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुप एमध्ये आहेत. त्यांच्यासोबत बाकी दोन संघ न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत. तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडला ठेवण्यात आले आहे.



प्रत्येक ग्रुपमध्ये किती सामने खेळवले जाणार


सर्व ८ संघ आपापल्या ग्रुपमध्ये ३-३ सामने खेळतील. यानंतर प्रत्येक ग्रुपमधील टॉप २ संघ सेमीफायनलासाठी क्वालिफाय ठरतील. पहिला सेमीफायनलचा सामना दुबई, दुसरा लाहोरमध्ये होईल. यानंतर फायनल सामना खेळवला जाईल.



स्पर्धेतील ग्रुप


ग्रुप ए - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
ग्रुप बी - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड



चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक


१९ फेब्रुवारी - पाकिस्तान वि न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२० फेब्रुवारी - बांग्लादेश वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
२१ फेब्रुवारी - अफगानिस्तान वि दक्षिण अफ्रीका, नेशनल स्टेडियम, कराची
२२ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२३ फेब्रुवारी - पाकिस्तान वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
२४ फेब्रुवारी - बांग्लादेश वि न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया वि दक्षिण अफ्रीका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी- अफगानिस्तान वि इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२७ फेब्रुवारी - पाकिस्तान वि बांग्लादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी - अफगानिस्तान वि ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
१ मार्च - दक्षिण अफ्रीका वि इंग्लंड, नेशनल स्टेडियम, कराची
२ मार्च - न्यूझीलंड वि भारत, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई



सेमीफायनल आणि फायनलचे सामने


४ मार्च - सेमीफायनल १, दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
५ मार्च - सेमीफ़ायनल २, गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर
९ मार्च - फायनल - गद्दाफ़ी स्टेडियम, लाहोर (टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यास सामना यूएईमध्ये होईल.)

Comments
Add Comment

कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात

न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत!

[caption id="attachment_1076800" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात

IND vs NZ 1st Test: पंतची झेल घेण्यासाठी धाव आणि देवदत्त पडिक्कल कन्फ्यूज, झेल सुटला आणि गिलचा पारा चढला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने सरशी घेतली. मात्र