कॅमरन बेनक्रॉफ्टच्या आरोपानंतर पॅट कमिन्स घरातून बाहेर पडणं झालं कठीण! पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आलं आहे. उस्मान ख्वाजाचं पुस्तक आणि त्यानंतर कॅमरन बेनक्रॉफ्टने केलेल्या खुलाशानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ या प्रकरणात होता, या आरोपानंतर पॅट कमिन्सचं घरातून बाहेर निघणं कठीण झालं आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात चेंडूसोबत छेडछाड करण्यात आली होती. यासाठी सँडपेपरचा वापर करण्यात आला होता. मात्र ही कृती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झाली होती. तसेच क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती. यानंतर डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. मात्र उस्मान ख्वाजाच्या पुस्तकात सँडपेपरगेट प्रकरणबाबत खुलासा करण्यात आला. या प्रकरणाबाबत संपूर्ण संघाला माहिती होतं, असं नमूद करण्यात आलं. याला डेविड वॉर्नरने दुजोरा दिला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं. पण पॅट कमिन्सने पुस्तकातील दावा आणि आरोप फेटाळून लावला होता. असं असताना या प्रकरणातील आरोपी असलेल्या बेनक्रॉफ्टने धक्कादायक खुलासे केले आणि पुन्हा एकदा वातावरण गरम झालं.

पॅट कमिन्ससोबत काय घडलं?


कॅमरन बेनक्रॉफ्टने सांगितलं की, ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकाला माहिती होतं की मैदानात बॉल टॅम्परिंग होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पॅट कमिन्स रडारवर आला. इतकंच त्याचं घरातून बाहेर निघणंही कठीण झालं आहे. त्याच्या घराबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पॅट कमिन्स घराबाहेर उभा आहे आणि एक महिला रिपोर्टर सँडपेपरगेट प्रकरणी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहे. या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकाराने प्रश्न विचारण्यापूर्वी माफी मागितली, पण कमिन्सने उत्तर दिले की, कदाचित तिला प्रश्न विचारल्याबद्दल तितकी खंत वाटत नसेल, जितकी ती दाखवत आहे.







कॅमरन बेनक्रॉफ्ट काय म्हणाला?


कॅमरन बेनक्रॉफ्ट म्हणाला की, अनेक वर्षांपासून या प्रकरणाचं ओझं मनावर होतं. बेनक्रॉफ्ट म्हणाला की, 'दक्षिण आफ्रिकेत मी सँडपेपर वापरल्याबद्दल फक्त आम्हा तिघांनाच माहीत नव्हते. संपूर्ण संघाला माहीत होते.' बेनक्रॉफ्ट सांगितलं की, पहिल्या चौकशीदरम्यान याबाबत कही सांगितलं नव्हतं. कारण यामुळे इतरांच्या कारकिर्दीला धक्का बसला असता. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटची प्रतिष्ठा जपावी यासाठी सत्य उघड केलं नव्हतं.
Comments
Add Comment

न्यूझीलंडला धक्का! दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9 गडी राखून नमवलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 9

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथचा विक्रम मोडीत!

[caption id="attachment_1076800" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात

IND vs NZ 1st Test: पंतची झेल घेण्यासाठी धाव आणि देवदत्त पडिक्कल कन्फ्यूज, झेल सुटला आणि गिलचा पारा चढला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने सरशी घेतली. मात्र

IND vs NZ 1st Test: टीम इंडियाची चांगली सुरूवात, पण सहाव्या विकेटने केली गडबड; पहिल्या दिवशी असं घडलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे सुरू आहे. या सामन्यात