Pune : पुणे हादरलं! खेळताना बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांचे दयनीय अवस्थेत आढळले मृतदेह

पुणे : कल्याण मधील घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरू नगर मध्ये दोन चिमुकल्या मुलींची हत्या करण्यात आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन मुली अचानक गायब झाल्या होत्या. मात्र त्यांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरा एका इमारतीच्या बाजूला दयनीय अवस्थेत एका पिंपात आढळले आहे. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराजवळून बेपत्ता झाल्या होत्या.



ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. राजगुरूनगर येथे काल दुपारी दोन चिमुकल्या घराजवळ खेळतांना बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने