Australia vs India : मेलबर्नमध्ये भारताचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी

मेलबर्न : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चार कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने २ - १ अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना १८४ धावांनी जिंकला. भारताने पर्थमधील कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाने अॅडलेड आणि मेलबर्नची कसोटी जिंकली. ब्रिस्बेन येथील कसोटी अनिर्णित राहिली. आता सिडनीत होणाऱ्या कसोटीत भारताचा विजय झाल्यास मालिक बरोबरीत सुटेल पण हा सामना अनिर्णित राहिला अथवा भारताने गमावला तर ऑस्ट्रेलिया यंदाची बॉर्डर - गावसकर ट्रॉफी जिंकेल.



मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २३४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १५५ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावा केल्या. रिषभ पंतने ३० धावा केल्या. इतर फलंदाज वैयक्तिक दोन आकडी धावा पण करू शकले नाही. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा फक्त नऊ धावा करू शकला तर स्टार फलंदाज विराट कोहली पाच धावा करुन बाद झाला. रवींद्र जडेजाने २, नितीश रेड्डीने १, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५, आकाश दीपने ७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. नॅथन लायनने दोन तर त्राविस हेड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला.



ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटच्या पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या. त्याने दोन्ही डावात भारताच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच (प्लेअर ऑफ द मॅच) या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम