Eknath Shinde : गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 'सर्वांसाठी घरे' ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


गिरणी कामगारांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, कामगारांसाठी घरे, भाडेतत्त्वावर घरकुले, पुनर्विकास, इको फ्रेंडली घरकुले, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबतची तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.



या बैठकीमध्ये गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

धारावीतील लोकमान्य टिळक महापालिका अखत्यारीत डायलिसिस सेंटरच्या खासगीकरणाला विरोध; सुधार समितीने प्रस्ताव फेटाळला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धारावी येथील छोटा शीव रुग्णालयातील डायलिसीस केंद्राच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सुधार

आरे कॉलनतील आदिवासी जनतेला घराजवळ आरोग्य सुविधा, आरे रुग्णालय ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): आरे कॉलनीतील आदिवासी जनतेसह स्थानिकांना आरोग्य सेवा आता मिळणार असून आरे रुग्णालय

Railway News : मुंबई ते सहरसादरम्यान 2 अतिरिक्त विशेष रेल्वे; 19 नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार

मुंबई: सण-उत्सवांच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक

दादर रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच ‘चैत्यभूमी’ होणार! विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या

Mumbai News : ChatGPT वापरून लोकलचा पास बनवला बनावट! महिनाभर AC लोकलमध्ये प्रवास, अखेर टीसींनी पकडले

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर अनेक कामांसाठी केला जात असताना, त्याचा गैरवापर करून रेल्वेची

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि