Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ७ जानेवारी २०२५
January 7, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती पौष शुद्ध अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती. चंद्र रास मीन योग शिव भारतीय सौर १७ पौष शके १९४६. मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय १२.३१, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्र चंद्रास्त १.२९. उद्याची राहू काळ ३.३० ते ४.५३. दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी नवरात्रोस्तावरंभ, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. धनलाभाचे योग.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्य उदय होईल.
मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : सुसंवाद घडवून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल.
सिंह : सामाजिक कार्यक्रमांची निमंत्रणे मिळू शकतात.
कन्या : इतरांचे मार्गदर्शन लाभेल.
तूळ : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
वृश्चिक : कार्यक्षेत्र वाढून कार्य व्याप्तीही वाढेल.
धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मकर : जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
कुंभ : काही वेळेस अचानक खर्च करावा लागू शकतो.
मीन : काही बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.