Team india: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबई : बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा(Team india) पराभव झाला होता. या मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही मात्र गोलंदाजांनी आपली भूमिका उत्तम निभावली. पण या मालिकेनंतर आता टीम इंडियावर दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.मालिकेदरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यानंतर आता आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.


बॉर्डर गावस्कर मालिकेच्या शेवटच्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे मन जिंकणाऱ्या आकाश दीपला दुखापत झाली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात आकाश दीपला पाठदुखीमुळे खेळता आले नव्हते.त्यांनतर आकाश दीपला उपचारांसाठी बंगळुरू येथील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे जावे लागेल.



एनसीएमधील बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि आवश्यक उपचार देईल. सध्या तरी त्याला महिनाभर मैदानापासून दूर रहावे लागणार आहे.आकाश दीपची दुखापत बंगालसाठी देखील एक धक्का मानला जात आहे. आकाश दीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. एकूण ७ कसोटी सामने खेळणारा आकाश दीप अद्याप भारतासाठी एकदिवसीय किंवा टी-२० सामने खेळलेला नाही. पण कसोटी सामन्यातील त्याची लय पाहिल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता होती मात्र आता दुखापतीमुळे त्याला संधी मिळणे अवघड झाले आहे.


भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला आपला संघ जाहीर करायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद शमी हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे टीम इंडियाची गोलंदाज निवडताना मोठी कसरत होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात कोणाला स्थान मिळते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2027: महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडला होणार फायदा? कसं काय ते समजून घ्या

[caption id="attachment_1076673" align="aligncenter" width="800"] महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागच्या तीन पर्वापासून नेतृत्वाची जबाबदारी

IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असलेली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड

Nashik : अभिमानास्पद ! जागतिक युवा टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या कुशल चोपडाची भारतीय संघात निवड

नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी आहे. टेबल टेनिसपटू कुशल चोपडा याची प्रतिष्ठेच्या

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिटेन केलं की नाही? लखनौ सुपर जायंट्सने स्पष्ट केलं की...

आयपीएल 2027 स्पर्धपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक

आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ! अर्शदीप सिंगची जबरदस्त झेप, तर 'या' नवख्या खेळाडूने रचला जागतिक विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अनेक दिग्गज आणि युवा खेळाडूंनी मोठी झेप घेतली

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठा भूकंप; कर्णधार पॅट कमिन्सवर फसवणुकीचा आरोप, कॅमरन बेनक्रॉफ्टच्या 5 विधानांनी उडाली खळबळ!

सँडपेपरगेट प्रकरण हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन