सँडपेपरगेट प्रकरण हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पुरती नाचक्की झाली. 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हे प्रकरण घडलं होतं. तेव्हा स्टीव्ह स्मिथ, कॅमरन बेनक्रॉफ्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांना या प्रकरणी दोषी धरण्यात आलं. त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. पण उस्मान ख्वाजाचं पुस्तक रिलीज झालं आणि हे प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं. सँडपेपरगेट प्रकरणाबाबत संघातील सर्व खेळाडूंना माहिती होतं, असा आरोप त्याने आपल्या पुस्तकात केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अडकलेल्या कॅमरन बेनक्रॉफ्टने आता काय आणि कसं झालं? याचा उलगडा केला आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाचे हेड कोचसह स्टार्क, कमिन्स आणि वरिष्ठ खेळाडू या प्रकरणात सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमरन बेनक्रॉफ्टने काय सांगितलं ते जाणून घेऊयात..
कॅमरन बेनक्रॉफ्टने वेस्ट ऑस्ट्रेलिया वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये बराच उलगडा केला आहे. यात त्यांनी आरोप केला की, 2018 मध्ये संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला या प्रकरणाची माहिती होती. सँडपेपरचा वापर करत असल्याची कल्पना होती. या प्रकरणात फक्त वॉर्नर, स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट दोषी नव्हते.
कसोटी मालिकेत डरबनमध्ये सँडपेपरचा वापर झाला नव्हता. पण दुसऱ्या कसोटीत टी ब्रेक दरम्यान ड्रेसिंग रुममध्ये चर्चा झाली की चेंडू रिव्हर्स स्विंग कसा करायचा. डेविड वॉर्नरने सँडपेपरची सूचना दिली. पण कॅमेरे त्याच्याकडे जास्त फोकस करत असल्याने तो त्याचा वापर करू शकत नव्हता.
IPL 2027 Auction: आयपीएल 2027 लिलावाची प्रतीक्षा संपली! तारीख आणि वेळ जाहीर
आयपीएल स्पर्धेचं 20वं पर्व वर्ष 2027 मध्ये पार पडमार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून ...
कॅमरन बेनक्रॉफ्टने सांगितलं की, हेड कोच डॅरेन लेहमॅन आणि गोलंदाज प्रशिक्षक डेविड सेकर सँडपेपरच्या बैठकीत होते. स्मिथने सांगितलं की तो या प्रकरणात सहभागी होऊ इच्छित नाही.
कॅमरन बेनक्रॉफ्टने सांगितलं की, युवा खेळाडू होतो आणि टीममध्ये योगदान देऊ इच्छित होतो. त्यामुळे चेंडूवर सँडपेपर घासण्याचं काम करण्यास सहमती दर्शवली. याबाबत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श फिडबॅक घेत होते की चेंडू रिव्हर्स स्विग होत आहे की नाही.
कॅमरन बेनक्रॉफ्ट पुढे स्पष्ट केलं की, कसोटी सामन्यात जेव्हा सँडपेपरसोबत पकडलं गेलं तेव्हा पीटर हँड्सकॉम्ब मैदानावर आले आणि सँडपेपर घेऊन गेला. डॅरेन लेहमॅनने वॉकी टॉकीवर सूचना दिली होती की सँडपेपर मैदानाच्या बाहेर घेऊन जा. कॅमरन बेनक्रॉफ्टच्या या खुलाशानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ दोषी असल्याचं सिद्ध होतं. बेनक्रॉफ्टने सांगितलं की, पॅट कमिन्से पत्रकार परिषदेत खोटं सांगितलं. त्यामुळे नेमकं सत्य काय हे सर्वांसमोर ठेवलं.