Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, १० जानेवारी २०२५
January 10, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती पौष शुद्ध एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २० पौष शके १९४६ म्हणजेच शुक्रवार, दि. १० जानेवारी २०२५, मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय २.४८, मुंबईचा सूर्यास्त ६.१७, मुंबईचा चंद्रास्त ४.३८, उद्याची राहू काळ ११.२३ ते ०५.३३, पुत्रदा एकादशी, शुभ दिवस दुपारी १.४५ नंतर.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : अश्वासक परिस्थिती राहील.
वृषभ : प्रवाही आणि वेगवान घटना घडतील.
मिथुन : मित्रमंडळींच्या वर्तुळात तसेच कुटुंबांमध्ये वादविवाद टाळा.
कर्क : गुप्त चिंता मनात घर करून राहील.
सिंह : व्यवसाय-धंद्यात सरकारी नियम तसेच कायदे पाळा.
कन्या : व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात, ते टाळा.
तूळ : कुसंगती टाळणे हितकारक ठरेल.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात वाद-विवाद नको.
धनू : स्वतःच्या मतास नियंत्रणात ठेवा.
मकर : व्यवसायात काही नवीन बदल केलेले सफल होतील.
कुंभ : महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूल दिवस.
मीन : कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.