Smriti Mandhana : स्मृती मंधाना ठरली सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज

राजकोट : भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेत स्मृती मंधानाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळताना स्मृती मंधानाने सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. तिने अवघ्या ७० चेंडूत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली आहे.



स्मृती मंधाना हिने अवघ्या ७० चेंडूत शतक पूर्ण केले. या कामगिरीसह भारतीय महिला संघाकडून सर्वात जलदग शतकी खेळीचा विक्रम आता स्मृती मंधानाच्या नावे झाला आहे. स्मृती मंधाना हिने आयर्लंड विरुद्धच्या आपल्या वादळी खेळीत ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावा काढल्या. स्मृती मंधाना हिने ऑयर्लंड विरुद्धच्या जलद शतकी खेळीसह नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडित काढला आहे. हरमनप्रीत कौरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ८७ चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता दुसऱ्या स्थानावर असून स्मृती मंधाना अव्वलस्थानी विराजमान झालीये. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह महिला क्रिकेटमधील १० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या निवडक फलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.


मंधानाच्या व्यतिरिक्त, मेग लॅनिंगने १५ शतके आणि सुझी बेट्सने १३ शतके झळकावली आहेत. टॅमी ब्यूमोंटनेही १० शतके केली आहेत. आयर्लंडविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजीला येताच, स्मृती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. स्मृतीने ताबडतोड फलंदाजी करत प्रतिका रावलसोबत मिळून पावरप्लेमध्ये ९० धावा चोपल्या. या दोघींनी मिळून अवघ्या ७७ चेंडूत शतकी भागीदारी केली. स्मृती मंधानाने फक्त ७० चेंडूत शतकी खेळी केली. तिने प्रतीकासोबत २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. ८० चेंडूंचा सामना करताना स्मृती मंधानाने १२ चौकार आणि ७ षटकार मारले आणि १३५ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतली.

Comments
Add Comment

IPL 2027: महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडला होणार फायदा? कसं काय ते समजून घ्या

[caption id="attachment_1076673" align="aligncenter" width="800"] महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर मागच्या तीन पर्वापासून नेतृत्वाची जबाबदारी

IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असलेली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड

Nashik : अभिमानास्पद ! जागतिक युवा टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या कुशल चोपडाची भारतीय संघात निवड

नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी आहे. टेबल टेनिसपटू कुशल चोपडा याची प्रतिष्ठेच्या

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिटेन केलं की नाही? लखनौ सुपर जायंट्सने स्पष्ट केलं की...

आयपीएल 2027 स्पर्धपूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक

आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ! अर्शदीप सिंगची जबरदस्त झेप, तर 'या' नवख्या खेळाडूने रचला जागतिक विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अनेक दिग्गज आणि युवा खेळाडूंनी मोठी झेप घेतली

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठा भूकंप; कर्णधार पॅट कमिन्सवर फसवणुकीचा आरोप, कॅमरन बेनक्रॉफ्टच्या 5 विधानांनी उडाली खळबळ!

सँडपेपरगेट प्रकरण हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन