Starbucks Rule : ...अन्यथा स्टारबक्समध्ये नो एन्ट्री!

मुंबई : नवे वर्ष सुरु होताच अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल केले जातात. अशातच अमेरिकन कॉफी ब्रँड स्टारबक्सने (Starbucks Rule) देखील नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून काही ग्राहकांना महागात पडणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.



स्टारबक्सने जारी केलेल्या नियमानुसार, ग्राहकांना एमरजन्सीसाठी वॉशरुम किंवा फ्री वाय-फाय वापरायचे असल्यास कॅफेमधून काहीतरी खरेदी करावे लागणार आहे. हा नवा नियम २७ जानेवारीपासून लागू होणार आहे.


त्याचबरोबर कॅफेमध्ये बसून दारू पिणे, धूम्रपान करणे, ड्रग्जचे सेवन करणे यासारख्या गोष्टींवर आता बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. कोणीही असे करताना आढळल्यास, त्याला त्वरित कॅफे सोडण्यास सांगितले जाईल. गरज पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाईल. कॅफेमधील कर्मचाऱ्यांना आता या नव्या नियमाची माहिती दिली जाणार असून त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.


याबाबत स्टारबक्सचे प्रवक्ते जेसी अँडरसन यांनी याबाबत सांगितले की, अनेक रिटेल स्टोअरमध्ये हा नियम आधीपासूनच लागू आहे. त्याचप्रमाणे स्टारबक्स कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आरामदायी वाटण्यासाठी तसेच योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. (Starbucks Rule)

Comments
Add Comment

Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; मुंबईसह 21 जिल्ह्यांना अलर्ट, ‘या’ भागांत वादळी पावसाची शक्यता!

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. दरम्यान,

FDA Raid Maharashtra : सण-उत्सवांच्या काळात अन्न सुरक्षेसाठी FDAची राज्यभर विशेष मोहीम; ९.७६ कोटी रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त

मुंबई : महाराष्ट्रात सण-उत्सवांच्या काळात भाविकांना शुद्ध आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध

CM Devendra Fadnavis : दुष्काळाचा 'जीआर' उद्या काढणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘ट्रिगर वन’नुसार निर्णय, हेक्टरी मदत, चारा-पाणीटंचाईवर उपाय आणि रब्बी पेरणीसाठी

Bachchu Kadu News: दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार

मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक

Ganpati Idol Recycling : गणपतीच्या मूर्तीपासून चक्क स्टडी टेबल! नवी मुंबईत POPच्या मूर्तींचा अनोखा पुनर्वापर

नवी मुंबई : गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित झाली आणि काही दिवसांनी त्याच मूर्तीचं रूप एखाद्या मुलाच्या