राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प भारत दौरा करणार? 

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प आज २० जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत आहेत. पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौर्‍याबाबत सल्लागारांशी चर्चा केली असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. ही भेट एप्रिलच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या शेवटी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाइट हाऊसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करण्याच्या विचारावरही ट्रम्प कार्य करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित केला जाऊ शकतो.


ट्रम्प यांनी चीनवर जास्तीचे शुल्क लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले होते.मात्र, ट्रम्प आता चीन-अमेरिका संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करु इच्छित आहेत आणि यासाठी त्यांनी चीन दौर्‍याचा विचारही सुरू केला आहे.


भारत आणि चीन दौऱ्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि जागतिक स्थिरतेसाठी या दौऱ्यांना महत्त्व दिले जात आहे.

Comments
Add Comment

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.