Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ जानेवारी २०२५
January 24, 2025 04:07 AM
पंचांग
आज मिती पौष कृष्ण दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा योग वृद्धी. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर ४ माघ शके १९४६ म्हणजेच शुक्रवार, दि. २४ जानेवारी, २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ३.२६, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ६.२६, मुंबईचा चंद्रास्त १.३९, राहू काळ ११.२६ ते १२.५०. ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस-सायंकाळी ७.२४ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०७ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळू शकेल. रोजगाराचा प्रश्न सुटेल.
वृषभ : सामाजिक मानसन्मान मिळेल. एखादे महत्त्वाचे पद मिळेल.
मिथुन : महत्त्वाची कामे होतील.
कर्क : कुटुंब-परिवारात सुवार्ता मिळतील.
सिंह :वैवाहिक जीवनात विशिष्ट भाग्योदय होईल.
कन्या : आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवा.
तूळ :प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. मुला-मुलींचे उत्कर्ष होतील.
वृश्चिक : वादविवाद टाळा, गैरसमज टाळा.
धनू : वैवाहिक जीवनात विसंवाद घडू शकतात.
मकर : नोकरीतील नव्या बदलातून लाभ होईल, उत्तम दिलासा मिळेल.
कुंभ : शारीरिक दुखापतीपासून दूर राहा.
मीन : नोकरीत अनुकूलता लाभेल. वरिष्ठांचे संबंध सुधारतील.