वडिलांचा मृत्यू सहन न झाल्याने मुलीनेही संपवले जीवन

नाशिक : उपचारासाठी दाखल केलेल्या वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच दुःखी झालेल्या तरुणीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथे घडली. या घटनेनंतर बापलेकीची अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात येऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारूती वाघमारे (रा. ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) हे पत्नी, मुलगा, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी यांच्यासह राहत होते. दरम्यान, वाघमारे यांची मोठी मुलगी दसक परिसरात राहते. तिच्या घराचे बांधकाम सूरू असल्यामुळे तिच्या आठ वर्षाच्या मुलीसह वडिलांच्या घरी राहात होती.


मारूती वाघमारे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांच्या मुलाने बिटको रुग्णालयात उपचाराचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असे तिघेजण दवाखान्यात होते. दरम्यान, उपचार सुरू असताना वाघमारे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही वार्ता घरी असलेली त्यांची अविवाहीत मुलगी प्रिती वाघमारे (वय 29) ही मोठ्या बहिणीच्या मुलीसह घरी एकटीच होती. ही वार्ता समजल्यानंतर ती वडिलांच्या निधनाने भावनाविवश झाली.


त्यावेळी घराच्या हॉलमध्ये तिचा भाऊ व मोठी बहिण ही मोबाईल फोनद्वारे इतर नातेवाईकांना वडिलांच्या निधनाची माहिती देत होती. त्याचवेळी दुःख सहन न झाल्याने प्रिती वाघमारे हिने घरातील कॅनमध्ये असलेले रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले. ही घटना तिच्या सोबत असलेल्या आठ वर्षीय मुलीने पाहिल्याने तिने जोरात आराडाओरड करून घराबाहेर येऊन आईला व मामाला ही घटना सांगितली. तोपर्यंत या तरुणीला आगीने वेढले होते.


आग विझविण्याचा प्रयत्न करत तिचा भाऊ सचिन वाघमारे याने तिला औषध उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. धनवटे यांनी तिला तपासून मृत घोषित केले.


दरम्यान, वडिलांसह तरुणीचीही अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात येऊन दोघांवर दसक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबकगिर गोसावी हे करीत आहेत.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रखडलेली मदत मिळवण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

मुंबई :  शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे अद्याप जमा झाले नसल्या

वैशाली आणि रूपाली हॉटेलनंतर पुण्यातील खाऊ गल्लीतल्या विक्रेत्यांवरही FDA ची धाड, 5 आस्थापनांना दिली 'व्यवसाय बंद'ची नोटीस

पुणे: सुट्टीच्या अनेक पुणेकरांच्या नाश्त्याची सोय होणाऱ्या सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या हॉटेलवर अलीकडेच FDA

Pune Crime: रिक्षेतून MD विक्रीचा प्रयत्न उधळला! मार्केटयार्डमध्ये तिघे ताब्यात

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मार्केटयार्ड परिसरात

IAS Transfer: तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

मुंबई: राज्य शासनाने तीन वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा एकदा काल

Weather Upadates: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकट; महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान?

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर देशातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले

Prahaar Marathi News Live, 18 November 2026 : नागपूर अधिवेशन दोन आठवड्यांचं, 7 ते 18 डिसेंबरदरम्यान होणार

Prahaar Marathi News Live दिनांक 18 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,