वैशाली आणि रूपाली हॉटेलनंतर पुण्यातील खाऊ गल्लीतल्या विक्रेत्यांवरही FDA ची धाड, 5 आस्थापनांना दिली 'व्यवसाय बंद'ची नोटीस

पुण्यातील वैशाली आणि रूपाली या प्रसिद्ध हॉटेलवर FDA ने धाड टाकत स्वच्छतेच्या त्रुटीमुळे त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ह्या दोन्हीही हॉटेलनंतर, कॅम्पपरिसरातील एम.जी. रोडवर असणाऱ्या खाऊ गल्लीतील 5 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे: सुट्टीच्या अनेक पुणेकरांच्या नाश्त्याची सोय होणाऱ्या सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या हॉटेलवर अलीकडेच FDA धाड टाकली. या दोन्हीही हॉटेलवर FDA ने धाड टाकत स्वच्छतेच्या त्रुटीमुळे त्यांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ह्या दोन्हीही हॉटेलनंतर, कॅम्पपरिसरातील एम.जी. रोडवर असणाऱ्या खाऊ गल्लीतील 5 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर 2026 रोजी, 15 आस्थापनांच्या तपासणीमध्ये वैध FSSAI परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय करणाऱ्या 5 आस्थापनांना व्यवसाय बंदची नोटीस देण्यात आली आहे.






कॅम्पपरिसरातील एम.जी. रोडवर असणाऱ्या तावूत स्ट्रीटवर असणाऱ्या खाऊ गल्लीतील, मे. क्लासिक क्लव सँडविच, मे. श्री कृष्णा छोले भटुरे, मे. ए-१ सँडविच, मे. लेट्स वार्वेक्यू, मे. श्री कृष्णा चौपाटी या पाच आस्थापनांना व्यवसाय बंदची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतही अनेक ठिकाणी FDA कडून कारवाई करण्यात आली आहे. लेवलवरील विसंगती, व्यवसाय प्रकार, FSSAI च्या 3 जून 2026 च्या निर्देशानुसार प्रतिबंधित Nicotinamide Mononucleotide आणि उत्पादन मान्यता (Product Approval) नसलेल्या Magnesium Acetyl Taurate चा वापर केल्यामुळे वडाळा पश्चिमेतील आणि जोगेश्वरी पूर्वेतील कंपनींवर कारवाई करण्यात आली आहे.






घाटकोपर पूर्वेतील साई किचन (बिग फॅट मंक) या हॉटेलचा, अस्वच्छ परिसर, कीटकांचा वावर, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र साठवणे आणि कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने व वैद्यकीय नोंदी नसल्यामुळे शिवाय, प्रशासनामार्फत केलेल्या तपासणीत केवळ 48% गुण मिळाल्याने परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. सुजित क्रीमी क्रिएशन (7th Heaven) नावाने कार्यरत असलेल्या शॉपचा सुद्धा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिमेतील न्यू लिंक रोडवरील लालजीपाडा परिसरातील मे. चौरसिया पान अँड बिडी सेंटर आणि मे. नाग पान शॉप येथे विक्रीसाठी साठवलेले विमल, राजनिवास, वाजीराव, कमला पसंद इ. 15 प्रकारचे 870 पाऊच 3584 रूपयांचा प्रतिबंधित पदार्थ साठा जप्त करण्यात आला. दोन्ही दुकानदाराविरोधात, कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये FIR क्र. 1481/ 2026 दाखल करण्यात आला आहे. BNS कलम 223, 274, 275, 123 आणि अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 चे कलम 3 (1) (zz) (iv), 26(2)(i), 26(2)(iv), 27(3) (e) आणि 30(2) (a) सह कलम 59 चे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime: रिक्षेतून MD विक्रीचा प्रयत्न उधळला! मार्केटयार्डमध्ये तिघे ताब्यात

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मार्केटयार्ड परिसरात

IAS Transfer: तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

मुंबई: राज्य शासनाने तीन वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा एकदा काल

Weather Upadates: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकट; महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान?

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर देशातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले

Prahaar Marathi News Live, 18 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 18 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमीतून चारा लागवडीला चालना

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर

अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा दणका

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेच्या शिस्तीचा अभाव