Prahaar Marathi News Live, 18 November 2026 : दक्षिण काश्मिरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाचा वॉन्टेड कमांडर भारतीय जवानांच्या रडारवर

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 18 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर...

LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live: दक्षिण काश्मिरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा वॉन्टेड कमांडर भारतीय जवानांच्या रडारवर

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बुधवार सकाळपासून येथे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम आणि दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबाचा वॉन्टेड कमांडर लतीफ भट या परिसरामध्ये लपून बसल्याचे वृत्त आहे. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, लतीफ भट कुलगामच्या याच भागात लपला आहे. सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकार्‍यांनी संपूर्ण परिसर वेढला असून शोध मोहीम सुरू आहे. चकमकीबाबत अधिक तपशील आणि दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची अधिकृत माहिती मिळाली नाही.

Prahaar Marathi News Live: आयफोनच्या EMI वरून वाद, पनवेलमध्ये मित्रानेच मित्राची केली हत्या; आरोपीला अटक

पनवेलमध्ये आयफोनच्या ईएमआयच्या थकित हप्त्यांवरून झालेल्या वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतीक अंबवले असे मृत तरुणाचे नाव असून, प्रतीक जाधव असे आरोपीचे नाव आहे. वादातून आरोपीने तरुणाची हत्या करून मृतदेह झुडपांमध्ये टाकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तपासाअंती आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातून रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

MS Dhoni CSK Mentor : धोनीची नवी इनिंग सुरू! IPL 2027 मध्ये CSK च्या मेंटरपदाची धुरा सांभाळणार

चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांचे दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२७ च्या

Nitesh Rane vs Rohit Pawar : रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची हिंमत करू नये! मंत्री नितेश राणेंचा इशारा

पवार कुटुंबीयांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी

PM Modi Barong Tagalog : पंतप्रधान मोदींचा फिलिपिन्सच्या 'बॅरोंग टॅगालॉग' पोशाखात रॉयल लूक; 'गाला डिनर'मध्ये वेधले जागतिक नेत्यांचे लक्ष!

अनिवासी भारतीयांना आपुलकीची विचारपूस! मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या फिलिपिन्स

Chipi Airport: चिपी-नवी मुंबई विमानसेवेला 16.74 कोटींचे ‘व्हीजीएफ’ अनुदान

मुंबई(सुहास शेलार): सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा चालविणाऱ्या ‘जस्ट उडो एव्हिएशन

Chipi Airport : चिपी विमानतळ आता पुन्हा बंद पडणार नाही- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्ग : दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी विमानतळावरून नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू