Pune-Bhor Accident : पुण्यात अपघात, कार १०० फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, ८ गंभीर जखमी

पुणे : भोर - महाड मार्गावर वरंध घाटात अपघात झाला. कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी पोलिसांच्या सहकार्याने मदतकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.


पुण्यातील भोर - महाड मार्गावर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वरंध घाटात अपघात झाला. इको कार महाडहून पुण्याच्या दिशेला जात होती. कार उंबरठे गावाजवळच्या रस्त्यावरुन पुढे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून बाकी ८ जण गंभीर जखमी आहेत.



अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढलं. जखमींना तात्काळ दरीतून बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले. पोलीस अपघात प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी