महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नजर ठेवून आहेत. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एका तासाच्या आत दोनवेळा उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.



या संबंधी पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. ते सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी बातचीत करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


 


भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व आरोग्य सेवांच्या मदतीचे आश्वासन दिले. योगी आदित्यनाथ यांनी नड्डा यांना सांगितले की परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Election : UP निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मथुरा प्लॅन' काय आहे ? श्रीकृष्ण जन्मभूमी आणि UCC चा राजकारणावर कसा परिणाम होणार ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच

'लश्करचा शेवटचा स्थानिक दहशतवादी ठार!' केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधान; सुरक्षा दलांचे कौतुक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर

Akvan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा वेग वाढला; 20 नोव्हेंबरला किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अकवान चक्रीवादळ बुधवारी तीव्र वादळात रूपांतरित झाले असून २० नोव्हेंबर

Bird Flu : भारताला बर्ड फ्लूपासून मोठा दिलासा मिळणार ! देशातील पहिली स्वदेशी H5N1 लस तयार

नवी दिल्ली : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली

Prince William Delhi visit: अर्थशॉट पुरस्कारानंतर प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

कुटुंबीयांना सोडायला गेले अन् 36,000 चा फटका बसला, नातेवाईकांना दंड का भरावा लागला?

मुंबई: भारतीय रेल्वेचे नियम किती कडक आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रवाशांना कसा नाहक भुर्दंड बसू शकतो,