Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात युक्रेनियन अभिनेत्याला अटक

मुंबई : मुंबईतील टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आता युक्रेनियन अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याला मंगळवारी अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी अटक केलेला अभिनेत्याचं नाव आर्मेन अटाइन असं आहे. मूळचा युक्रेनियन नागरिक असलेल्या आर्मेन अटाइनला आर्थिक गुन्हे शाखेने मढमधून अटक केली. आर्मेन हा अनेक बॉलिवूड चित्रपटांसह जाहिरातींमध्ये सहायक अभिनेता म्हणून झळकला आहे. हजारो लोकांची फसवणूक करणारा टोरेस ब्रँड उभारण्यात आर्मेनने मदत केल्याचा आरोप आहे.आर्मेनच्या अटकेमुळे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहावर गेली आहे.


आर्मेनने आरोपींना मुंबईमध्ये टोरेस बँड उभारण्यात मदत केली. आर्मेन हा पॅनकार्ड काढण्यासाठी कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या तौसिफ रियाजला भेटला होता. आर्मेनने युक्रेनियन आरोपींशी तौसिफची भेट घालून दिल्याचे समोर आले आहे. तौसिफ रियाज हा स्वत: मागील अनेक आठवड्यांपासून फरार होता. त्याला काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यामधील हॉटेलमध्ये अटक केल्यानंतर पुढील तपासामध्ये पोलीस आर्मेन अटाइनपर्यंत पोहोचले. तौसिफला कोर्टाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कंपनीने ३७०० हून अधिक गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे. अगदी काही हजारांपासून ते काही कोटींपर्यंतची गुंतवणूक या गुंतवणुकदारांनी केली होती.



आर्मेन हा पहिल्या दोन बैठका आणि टोरेस ब्रँडच्या दादरमधील शोरूमच्या उदघाटनाला हजर होता. कंपनी सुरू झाल्यानंतर आर्मेन बाजूला झाला. त्यानंतर आर्मेन अटाइन हा या गुन्ह्यातील फरार तसेच अटक असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता का? यासंदर्भातील चौकशी सध्या पोलिस करत आहेत. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे जात आहे तसतसं आता फसवणुकीचा आकडा ७ ते ८ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आर्मेनने मुंबई महापालिकेचा बनावट जन्म दाखला मिळवला होता. त्याआधारेच त्याने आधार कार्ड, पॅनकार्ड तयार केले आहे. याच कागदपत्रांच्या आधारे आर्मेनने मुंबईमध्ये जन्म झाल्याचं दाखवत आपलं शहरामध्ये १० वर्षे वास्तव्यास असल्याचा दावा केला आहे. आर्मेनजवळ सापडलेल्या कागदपत्रांची पोलिस पडताळणी करत असून, तो तपासात सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका?

मुंबई: अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नोलॉजी संबंधित नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'तारा गॅस' टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; 22 हून अधिक कर्मचारी सुरक्षित, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ

जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz)

Donald Trump praises PM Modi : "पंतप्रधान मोदी हे अत्यंत खमके नेते!" - आसियान परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोदींच कौतुक

फिलिपिन्स : फिलीपिन्सची राजधानी मनीला येथे नुकतीच 'आसियान' (ASEAN) परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान अमेरिकेचे

US News : अमेरिकेत बँकिंग सेवांपासून विमान वाहतुकीपर्यंत तांत्रिक बिघाड; चेस, बँक ऑफ अमेरिका आणि युनायटेड एअरलाइन्सवर परिणाम

International News: अमेरिकेतील डिजिटल आणि पायाभूत सुविधांमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना सलग दुसऱ्या आठवड्यात त्रास

'आम्ही तुम्हाला शोधून काढू'; इराणकडून दोन अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांना थेट धमकी

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराणने अमेरिकन नौदलातील दोन वरिष्ठ

Donald Trump Philippines: ट्रम्प यांच्या दौऱ्याला फिलिपिन्समध्ये विरोध; मनिलाच्या रस्त्यांवर आंदोलकांचा गोंधळ

फिलिपिन्सची राजधानी मनिला रविवारी आंदोलनाने हादरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या