'आम्ही तुम्हाला शोधून काढू'; इराणकडून दोन अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांना थेट धमकी

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असून इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने अमेरिकन नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. 'आम्ही तुम्हाला शोधून काढू' अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराणने अमेरिकन नौदलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करून या दोन्ही अधिकाऱ्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या दूतावासाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली. त्यावर केवळ चार शब्द लिहिले होते - 'आम्ही तुम्हाला शोधून काढू.' या पोस्टमध्ये दोन अमेरिकन अधिकाऱ्यांना गुन्हेगार म्हणून संबोधण्यात आले होते. हे दोन्ही अधिकारी कोण आहेत, याची माहितीही दूतावासाने दिली आहे. कमांडर ली आर. टेट हे यूएसएस स्प्रान्स या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर आहेत, तर लेफ्टनंट कमांडर जेफ्री ई. यॉर्क हे त्याच युद्धनौकेचे कार्यकारी अधिकारी आहेत.


२९ मार्चच्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या दोन अधिकाऱ्यांनी तीन वेळा टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिले होते. फेब्रुवारी महिन्यात इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे एक क्षेपणास्त्र मिनाब येथील शजरे तैय्यबेह शाळेवर कोसळले होते. या हल्ल्यात १२३ मुलांसह किमान १६८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणकडून करण्यात येत आहे. याच हल्ल्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.






अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकन अधिकाऱ्यांवर हल्ला न करण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात इराणकडून ही धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना म्हटले होते की, जर एखाद्या वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याची हत्या झाली, तर इराणचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही.


दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांना तेहरानशी संबंधित व्यक्तींकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वॉशिंग्टनमधील त्यांच्या निवासस्थानावरून हलवून एका लष्करी तळावर ठेवण्यात आले आहे. इराणच्या या नव्या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनेकडे लक्षपूर्वक पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

Donald Trump Philippines: ट्रम्प यांच्या दौऱ्याला फिलिपिन्समध्ये विरोध; मनिलाच्या रस्त्यांवर आंदोलकांचा गोंधळ

फिलिपिन्सची राजधानी मनिला रविवारी आंदोलनाने हादरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या

PM Modi Barong Tagalog : पंतप्रधान मोदींचा फिलिपिन्सच्या 'बॅरोंग टॅगालॉग' पोशाखात रॉयल लूक; 'गाला डिनर'मध्ये वेधले जागतिक नेत्यांचे लक्ष!

अनिवासी भारतीयांना आपुलकीची विचारपूस! मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या फिलिपिन्स

महिला डायरेक्टरला 'आळशी' म्हणणं कंपनीला पडलं महागात; रोजगार न्यायालयाचा मोठा निर्णय

Danny Luo Unfair Dismissal Case: यूकेमधील एका एआय कंपनीने एका महिला डायरेक्टरला तिच्या सहकारी संचालकांनी 'अत्यंत आळशी' म्हणत

अमेरिका, रशिया आणि चीनचे राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर, 19 नोव्हेंबरला शेनझेनमध्ये ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक

जगातील तीन प्रमुख अण्वस्त्रधारी देशांचे राष्ट्रप्रमुख प्रथमच एकाच मंचावर येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

UAE Accident : UAE मधील भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; चार भारतीयांचा समावेश

UAE Accident: संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैरा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार

ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनिला दौऱ्याला सुरुवात; आसियान आणि क्वाड परिषदांमध्ये होणार महत्त्वपूर्ण चर्चा

ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते आसियान-भारत