भारत वि. इंग्लंड सामन्याची तिकिटे काही मिनिटातच संपली 

नागपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिका नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार असून रविवारी सकाळी १० वाजतापासून या सामन्याची ऑनलाईन तिकिट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण तिकिटे विकली गेली.


नागपूरमधील सामन्यासाठी तिकिटविक्री ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली.सहा वर्षानंतर नागपुरात सामना होत असल्याने तिकिटविक्री सुरू होण्यापूर्वी एक लाखाहून अधिक चाहते ऑनलाईन वेटिंग लिस्ट मध्ये होते.ही तिकिटविक्री जोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट ॲपच्या माध्यमातून झाली.व्हीसीएने प्रत्येक व्यक्तीला तिकिटविक्रीसाठी दोन तिकिटांची मर्यादा घातली असल्यामुळे अनेकांनी एकापेक्षा अधिक डिव्हाईसमधून तिकिटसाठी प्रयत्न केले.

सामान्य लोकांसाठी तिकिटविक्री सुरू होण्यापूर्वी व्हीसीए सदस्यांना तिकिटविक्री करण्यात आली. ऑनलाईन तिकिट घेतल्यावर लोकांना ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान प्रत्यक्ष तिकिट घ्यावे लागेल. व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स येथील मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९.३० ते रात्री ८.३० दरम्यान चाहत्यांना तिकिट घ्यावे लागेल. ६ फेब्रुवारी रोजी सामन्याच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी व्हीसीएमार्फत तिकिट उपलब्ध करून देण्यात आले.

सकाळी १०.३० च्या दरम्यान बहुतांश तिकिटांची विक्री झाली होती. यानंतरही सुमारे पन्नास हजार लोक प्रतीक्षा यादीत होते. समाज माध्यमावर अनेक लोकांनी तिकिट न मिळण्याची तक्रार केली. दुसरीकडे, समाज माध्यमांवरच अनेक लोकांनी तिकिटे मिळाली असून तिकिटे ब्लॅकमध्ये विकण्याबाबत संदेश टाकले. ८०० रुपयांची तिकिटाची किंमत २ ते ३ हजार तर एक हजाराच्या तिकिटाचा दर पाच ते सात हजार रुपये सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून