IND vs ENG: गौतम गंभीरची अग्निपरीक्षा सुरू...भारतीय संघ आता चॅम्पियन्सच्या ट्रॉफीच्या तयारीला

मुंबई: भारतीय संघ यावेळेस आपल्याच भूमीत इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. दोन्ही संघादरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने दमदार खेळ करताना ४-१ असा विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने यावेळी नेतृत्व केले होते. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडेची.


यासोबतच भारतीय संघ या महिन्यात आयसीसी चॅम्पियनशिप ट्ऱॉफी २०२५मध्येही खेळणार आहे. टीम इंडियाचे हे खरे मिशन आहे आणि यात हेड कोच गौतम गंभीरसह कर्णधार रोहित शर्माचीही अग्निपरीक्षा असणार आहे.



चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वनडे मालिका असणार खास


मात्र त्याआधी भारतीय संघाला आपल्याच घरात इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीनुसार ही मालिका अतिशय खास असणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅटही वनडे असणार आहे.



अशातच गंभीर आणि रोहित इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्व प्रयोग करतील. सोबतच या मालिकेतून टीम इंडियाची तयारीही दिसून येणार आहे. एकीकडे आपण म्हणू शकतो की इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेद्वारे भारतीय संघाचे मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल.



भारत-इंग्लंड वनडे मालिका


पहिली वनडे ६ फेब्रुवारी - नागपूर
दुसरी वनडे - ९ फेब्रुवारी - कट्टक
तिसरी वनडे - १२ फेब्रुवारी - अहमदाबाद



इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल(उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

Comments
Add Comment

नेमबाजीच्या मैदानाबाहेरही मनू भाकरचा धमाका! जागतिक स्तरावर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी; आता थेट नियम ठरवणार!

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकांची कमाई करून संपूर्ण देशाची मान उंचावणारी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आता जागतिक

अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप; नागपूरचा शौनक बडोले प्रथम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने

IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातून रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

चुकीला माफी नाही..! गुरनूर ब्रार आयसीसीने दिला दणका, टिम सैफर्टसोबत तसं वागणं पडलं महागात

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिकेनंतर वनडे मालिकेत विजय मिळवला. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी

Mitchell Santner : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बाहेर, किवी संघाला मोठा धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आगामी 2 सामन्यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

MS Dhoni: चेन्नईकरांच्या हृदयात धोनीला 'थाला'ची जागा कशी मिळाली?

रांचीमध्ये वाढलेला एक साधा मुलगा पुढे जाऊन चेन्नईकरांच्या मनात घर करेल, असं कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल.