New Mahabaleshwar : महाराष्ट्रात सुरु होणार नवे पर्यटनस्थळ!

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हटले की सर्वात आधी महाबळेश्वर समोर येते. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात. अशातच आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात एक नवे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे. (New Mahabaleshwar)



महाबळेश्वर पर्यटनाचे आकर्षणाचे स्थळ असून याठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामुळे महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटनस्थळाची रचना करण्यात येणार आहे. एमएमआरडीएकडून (MMRDA) 'नवीन महाबळेश्वर' या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा,पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील २३५ गावांचा समावेश करण्यात आला होता. आता आणखी नव्याने २९४ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोप वे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.



'सी प्लेन' प्रकल्प उभारणार


नवीन महाबळेश्वरमध्ये तीन व्यावसायिक विमानतळ प्रस्तावित आहेत. यामध्ये बाजे येथे धावपट्टी, तर उरमोडी, तापोळा येथे 'सी प्लेन' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किमी ते दोन किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्यात येणार आहे. बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल. उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे, तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे, तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे. उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना काही वेळेतच पोहोचता येणार आहे. (New Mahabaleshwar)

Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.