Kalyan : कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवाशांची लूटमार!

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूटमार होत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे तिकीट विक्री करणारा कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून जादा पैसे उकळत होता. कर्मचाऱ्याचे हे प्रकरण इतर प्रवाशांना कळताच त्यांनी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे.



नेमकं काय घडलं?


नालासोपारा इथे राहणारा धिरज विश्वकर्मा यांना कुंभमेळ्यानिमित्त प्रयागराज येथे जायचं होतं. प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढायचे असल्याने ते कल्याण रेल्वे स्थानकात गेले. तिथे गेले असता त्यांनी पाहिले की तिकीट खिडकीवरील कर्मचारी प्रत्येक प्रवाशाकडून जादा पैसे उकळत आहे. हा रेल्वे कर्मचारी प्रत्येक प्रवासीकडून ३० रुपये अतिरिक्तचे घेत होता. त्यावर, प्रवाशाने 'एका तिकिटामागे ३०-३० रुपये जास्त का घेत आहात? असा जाब विचारला असता, त्यावर कर्मचाऱ्याने आधी तिकीट काढलेल्या प्रवाशाला तिकीट दाखव, असे म्हणत त्याचे ३० रुपये परत करतो. पण, त्याने अशा प्रकारे याआधी अनेक प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ३० रुपये अधिकचे वसूल केले होते. यावर कर्मचारी त्या प्रवाशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत बाजूला सरकण्यास सांगत चुकून झाल्याचे बोलत आहे.


दरम्यान, तिकीट विक्री कर्मचाऱ्याने प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांकडूनच केले की इतरही प्रवाशांकडून त्याने असे पैसे वसूल केले, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली जात आहे.


Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत