महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२५ ला आजपासून सुरुवात 

मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास आजपासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादने, ग्रामीण कला, संस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.


या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४०० आणि इतर राज्यातून साधारण १०० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ८० स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे. मुंबईकरांच्या विशेष पसंतीच्या असलेल्या या भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. तो घेण्यासाठी मुंबई, ठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.



उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान


उमेद हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी "महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन" आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी "महालक्ष्मी सरस" चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.


Comments
Add Comment

Navi Mumbai Crime: टिंडर ॲपवरून मैत्री, बिअर पाजली, हॉटेलला बोलवून... मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण

Nitesh Rane News: हिंदू भूमीच्या रक्षणासाठी वराह देवाचे स्मरण आवश्यक, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ

Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! नवव्या दिवशी कमाईत ४२% वाढ, जगभरात २४६ कोटींचा टप्पा पार

मुंबई : ‘मिर्झापूर: द मुव्ही’ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. ४ सप्टेंबरला