Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार १५ फेब्रुवारी २०२५
February 15, 2025 04:05 AM
पंचांग
आज मिती माघ कृष्ण तृतीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग सुकर्मा. चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २६ माघ शके १९४६. शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय ०९.०३, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रास्त ०८.४३, राहू काळ ०९.५९ ते ११.२६. संत नरहरि सोनार पुण्यतिथी, संत सेवालाल महाराज जयंती, शुभ दिवस-सकाळी १०.४८ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडल्या जातील.
वृषभ : आपल्या प्रिय जनांसाठी मनसोक्त खर्च कराल.
मिथुन : नियोजित कामे वेगाने पार पाडू शकाल. कामाचा ताण जाणवू शकतो.
कर्क : ओळखी-मध्यस्थी उपयोगी पडतील. आर्थिक लाभ संभवतात.
सिंह : कुटुंब-परिवारात चांगल्या बातम्या येतील. आनंदात राहाल
कन्या : अचानक धनलाभाचे योग आहेत.
तूळ : भाग्याची साथ मिळेल असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
वृश्चिक : महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या
धनू : आपल्याला इतरांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील.
मकर : व्यवसायास पोषक ठरणाऱ्या काही घटना घडतील.
कुंभ : दीर्घ काळ रखडलेले एखादे काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मीन : शांतचित्ताने काम केल्यास विनाविलंब पूर्ण करू शकाल.