Eknath Shinde : मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरजेवर भर दिला. " जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल," असे त्यांनी सांगितले.



मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परदेशात ज्याठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मराठी भाषा जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केल्या. मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावे, यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यू आर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

Comments
Add Comment

फेक कंटेंट, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घाला! सोशल मीडिया कंपन्यांना अश्विनी वैष्णव यांचा इशारा

सोशल मीडिया अधिक जबाबदार करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी समाजात सखोल

Tata Motors best selling car : टाटाच्या या छोट्या कारने मार्केट हलवले! १० महिन्यांत ७० हजार ग्राहक झाले फिदा; पहा कोणती आहे ही गाडी ?

आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःची एक कार असावी. विशेषतः बजेट कमी असेल, तर लहान आणि

Admiral Krishna Swaminathan statement : "युद्धजन्य सागरी क्षेत्रातून भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही खंबीर!"- नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन

नवी दिल्ली : जगभरात सागरी तणाव वाढत असताना, होर्मुझ सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका का

Bharat Scouts and Guides: देवेंद्र फडणवीस यांची 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

भाजपकडून राघव चड्ढांना मोठी जबाबदारी; पंजाब निवडणुकीच्या जाहीरनामा समितीत नियुक्ती

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २०२७ च्या विधानसभा

केंद्र सरकारच्या सेवेत नोकरीची संधी! यूपीएससीमार्फत 'गट अ'च्या 13 पदांसाठी भरती; 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये थेट भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध