Entertainment News : राधा की कान्हा ? मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी!

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीकडून गोड बातमी समोर आली आहे. 'स्वराज्यजननी जिजामाता', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री अमृता पवारने एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. अमृताने २०२२ मध्ये नील पाटीलसोबत लग्न केलं आणि तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अमृता आणि नील यांच्या लग्नाला दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांच्या सुखी संसारात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अमृताने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओमार्फत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.



अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला एका एस्केलेटलरवरून दोन चपलांचे जोड खाली येताना दिसत आहेत. त्यानंतर अगदीच एक-दोन पायऱ्यांचं अंतर सोडून तिथे लहान मुलाची चप्पल दिसतेय. अखेरीस या तिन्ही चपला एस्केलेटलरच्या शेवटी येऊन पोहोचतात. त्यानंतर या व्हिडिओचा खरा अर्थ समजतो आहे. अमृताने हा व्हिडिओ शेअर करत "बेबी ऑन द वे..." असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे तिचे चाहते सुद्धा प्रचंड खुश झाले आहेत. अमृताचं काल डोहाळे जेवण देखील पार पडलं असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.





दरम्यान अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओ नंतर तिचे मित्रमैत्रिणी, सहकलाकार तसेच तिचे चाहते तिला पुढील वाटचालीसाठी भरभरभरून शुभेच्छा देत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा