Prince William Sachin Tendulkar : ब्रिटीश शाही जोडपे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांची मुंबईत सचिन तेंडुलकरसोबत 'गल्ली क्रिकेट'ची धमाल; शाळकरी मुलांसोबत रंगला सामना!

या क्रिकेट सामन्यादरम्यान तिथले वातावरण अतिशय उत्साही आणि आनंदी होते. सुरुवातीला प्रिन्स विल्यम यांनी बॅट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर त्यांनी प्रिन्सेस कॅथरीन आणि चक्क 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर यांनाही गोलंदाजी केली. सचिन तेंडुलकर यांनीही क्रीझवर उतरून आपल्या नेहमीच्या क्लासिक स्टाईलमध्ये फटके मारत उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली.

मुंबई : मुंबईच्या बॅलार्ड इस्टेट भागात सोमवारी सकाळी एक अतिशय सुंदर आणि न विसरता येण्यासारखा प्रसंग पाहायला मिळाला. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम (Prince Villiam) आणि प्रिन्सेस कॅथरीन ( Princess Kate ) यांनी भारताचे क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत मुंबईतील शाळकरी मुलांबरोबर 'गल्ली क्रिकेट' खेळण्याचा आनंद घेतला. हा खास कार्यक्रम आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि वसुंधरेबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.



क्रिकेटच्या मैदानावरील धमाल क्षण


या क्रिकेट सामन्यादरम्यान तिथले वातावरण अतिशय उत्साही आणि आनंदी होते. सुरुवातीला प्रिन्स विल्यम यांनी बॅट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर त्यांनी प्रिन्सेस कॅथरीन आणि चक्क 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर यांनाही गोलंदाजी केली. सचिन तेंडुलकर यांनीही क्रीझवर उतरून आपल्या नेहमीच्या क्लासिक स्टाईलमध्ये फटके मारत उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली.

मजेशीर गप्पा आणि मार्गदर्शनाचे क्षण


प्रत्यक्ष खेळ सुरू होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि या ब्रिटिश शाही जोडप्यामध्ये एक खूप छान आणि हसतखेळत संवाद झाला. सचिनजी आपल्या नेहमीच्या उत्साही अंदाजात हाताचे हावभाव करून प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांना क्रिकेटच्या काही महत्त्वाच्या आणि मजेशीर गोष्टी समजावून सांगत होते. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांनीही त्यांचे म्हणणे खूप लक्ष देऊन ऐकले आणि चेहऱ्यावर गोड हास्य ठेवून या गप्पांचा आनंद घेतला. सचिनजी जेव्हा प्रिन्स विल्यम यांना क्रिकेटचे धडे देत होते, तेव्हा कॅथरीन मिडलटन बाजूला उभ्या राहून अत्यंत आनंदाने हा सगळा खेळ पाहत होत्या.





कोणाचा पोशाख कसा होता ?


या खास कार्यक्रमात या सर्वच दिग्गजांच्या पेहरावाचीही बरीच चर्चा रंगली होती.


प्रिन्स विल्यम : यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्यावर गडद निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती.


प्रिन्सेस कॅथरीन : यांनी पांढऱ्या रंगाच्या टॉपवर फिकट लाईम-ग्रीन रंगाचा सुंदर ब्लेझर आणि मॅचिंग पँट घालीत अतिशय आकर्षक लूक केला होता.


सचिन तेंडुलकर : आपले लाडके 'मास्टर ब्लास्टर' नेहमीप्रमाणेच एकदम स्मार्ट आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसले. त्यांनी गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती, ज्यामुळे त्यांचा हा अंदाज खूपच खुलून दिसत होता. या मुलांसोबत आणि क्रिकेटच्या महान खेळाडूंसोबत वेळ घालवून ब्रिटीश शाही जोडप्याने मुंबईच्या या भेटीची सुरुवात अत्यंत संस्मरणीय केली.

Comments
Add Comment

Prince William India Visit : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन आज मुंबईत दाखल होणार; अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी भारत दौरा

मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन हे तीन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर