Ganeshotsv 2025 : गणपतीच्या पीओपीच्या मूर्तींना बंदी

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिकेने कांदिवलीतील माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच महापालिकेने येत्या २०२५ मधील आगामी गणेशोत्सवासाठी परिपत्रक जारी केलं आहे. माघी गणपतीपाठोपाठ आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवातही नियमांची आडकाठी येण्याची शक्यता आहे.



मुंबईतील कांदिवली परिसरात माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र विसर्जनावेळेस पोलिसांनी त्या मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. ही बंदी अजूनही कायम आहे. पीओपीच्या मुर्त्या विसर्जन करण्यासाठी महापालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले होते मात्र मंडळाच्या मूर्ती मोठ्या असल्याने मंडळाने या निर्णयाला विरोध केला. माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी महापालिकेने परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा तसेच आगामी गणेशोत्सवात पूर्णपणे पीओपीच्या मूर्तींना बंदी असेल असे नमूद करण्यात आले आहे.




मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?


१. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक ३०.०१.२०२५ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. १२.०५.२०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी...


२. मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.


३. सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.


४. मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास २००० प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.


५. येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशव्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा


६. उत्सवावादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहील एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी


सार्वजनिक उत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने, मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. पालिकेकडून नियमावली आल्याने आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे राहील.


Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर