BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

वरळीतील असफाल्ट प्लांटची जागा ३० वर्षांच्या भाडेकरारावर. जागेसाठी इंदिवरा रियल्टी प्रा. लि. यांनी लावली सर्वोच्च बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार वरळी येथील असफाल्ट प्लांट म्हणून ओळखल्या जाणा-या भूखंडाची जागा आता भाडेकरारावर ३० वर्षांकरता दिली जाणार आहे. तब्बल ११ हजार २९९.५३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी इंदिवरा रियल्टी प्रा. लि. यांनी सर्वोच्च बोली लावली आहे. या कंपनीला ८१५ कोटी ६१ लाख ०७ हजार एवढे अधिमुल्य, आणि प्रती चौ. मी. १ रुपया प्रती वर्ष या दराने भाडेपट्टयावर देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच यावर सुधार समितीच्या मंजुरीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.


मुंबई महापालिकेचा आस्फाल्ट प्लांट हा निवासी क्षेत्रामध्ये मोडत असून येथील नगर भू क्रमांक १६२९ (भाग) या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ ६५०८३.९० चौरस मीटर एवढे आहे. त्यापैकी आरफाल्ट प्लांट या विद्यमान सुविधेने बाधित भूभागाचे क्षेत्रफळ हे ११२९९.५३ चौरस मीटर एवढे आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मे. इंदिवरा रियल्टी प्रा.लि. सर्वोत्त बोली लावली. महापालिकेने अंदाजित केलेल्या ७५५ कोटी रुपयांच्या तुलनेत या कंपनीने ८१५.६१ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली आहे. विशेष म्हणजे या भूखंडाचा अंदाजित क्षेत्रफळ हे १०,८४७.७३ चौरस मीटर एवढे गृहीत धरले होते.






त्यानुसार याकरता प्रथम ७८३ कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली गेली होती. परंतु या जमिनीची संयुक्त मोजणी केल्यानंतर हे क्षेत्रफळ ११,२९९.५३ चौरस मीटर एवढे आढळून आले. त्यामुळे याकरता विकासकाने बोली वाढवून ८१५.६१ कोटी रुपयांची बोली लावली. त्यानुसार संबंधित कंपनीला प्रथमतः ३० वर्षाच्या मक्ता कालावधीकरिता भूभागाच्या क्षेत्रफळाच्या प्रती चौ. मी.एक रुपये प्रती वर्ष या दराने भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव आता सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुधार समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा

Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात लवकरच नर्सिंग कॉलेज होणार सुरु, महापालिकेच्यावतीने खासगी संस्थेची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील

Old Khopta Bridge: वर्षभरानंतर उरणचा खोपटा पूल पुन्हा सुरू, जेएनपीए आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा

उरणमधील जुना खोपटा पूल तब्बल वर्षभर बंद राहिल्यानंतर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी,14 नोव्हेंबर

जमिनीवर बसून मटणाचे जेवण, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा साधा अंदाज व्हायरल

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेदरम्यान मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याचा सहकारी

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि

व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले