पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा म्हणत टीसीएसच्या मॅनेजरने केली आत्महत्या

आग्रा : आई वडील आणि लाडक्या अक्कूची माफी मागत, पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा अशी मागणी करत; टीसीएसच्या मॅनेजरने आत्महत्या केली. पंख्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी मानव शर्माने सुमारे सात मिनिटांचा एक व्हिडीओ केला. या व्हिडीओद्वारे स्वतःची बाजू मांडून मानवने टोकाचे पाऊल उचलले.





मूळचा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारा मानव नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होता. तो टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नोकरीत स्थिरस्थावर होता म्हणून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत पती - पत्नीचे वारंवार वाद होऊ लागले. पत्नी मानवला आणि त्याच्या घरच्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती. वारंवार बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती. अखेर मानव सुटी घेऊन पत्नीसह आग्रा येथे आला. ज्या दिवशी घरी आला त्याच दिवशी थोड्या वेळाने तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला. मानवने पत्नीला २३ फेब्रुवारी रोजी माहेर सोडले. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मानवने आत्महत्या केली.



मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यापासून वायुदलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने, मानव शर्माने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा