राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार, महिला सुरक्षेचा मुद्दा गाजणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार ३ मार्चपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होईल. याआधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल.राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडक पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.



विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आले. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात ८ मार्च रोजी महिला दिननिमित्त महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करणार आहेत. तर २५ आणि २६ मार्च रोजी देशाच्या राज्यघेटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानावर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे. राज्याची कायदा - सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन आणि कापूस खरेदी तसेच पीक विमा, महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील तणाव हे मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील वाल्मीक कराडला अटक झाली आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य आणि खते, बी - बियाणे यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांचे राजकीय विरोधक करत आहेत. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. तर जळगाव जिल्ह्यात एका मंत्र्याच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. यामुळे अधिवेशनात राज्याची कायदा - सुव्यवस्था, महिला सुरक्षा या मुद्यावरुन विरोधक गदारोळ करण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे सादर करुन शासकीय योजनेत सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली आहे. या शिक्षेविरोधात कृषीमंत्र्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी सुनावणी व्हायची आहे. पण या निमित्ताने विरोधक कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

महायुतीने निवडणुकीत प्रचार करताना लाडकी बहीण योजनेत दरमहा १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा एप्रिलपासून अंमलात आणण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनातून घोषणा होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता