Teachers Protest : शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

मुंबई : शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन (Teachers Protest) केले. या आंदोलनात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज मो अभ्यंकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, सहभागी झाले होते.


जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा (Teachers Protest) सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले.



अशा आहेत मागण्या...


१. राज्यातील दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेश निर्गमित केलेल्या शाळांना पुढील टप्पा साठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद मिळावी.
२. दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३. संच मान्यतेचा जाचक शासन आदेश रद्द करावा.
४. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा.



उशिरा का होईना आमदाराने घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे. परंतु एवढ्यावरून समस्या सुटणाऱ्या नाहीत. कारण मंत्रिमंडळात निर्णय झाला. शासन निर्णय निघाला. परंतु अंमलबजावणी निधी अभावी नाही, ही दादांची दादागिरी समाज घडवणाऱ्या शिक्षकांची फसवणूक करणारी आहे. - संजय सुंदरराव डावरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबई
Comments
Add Comment

ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन यांच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल

मुंबई: ब्रिटनचे प्रिन्स विलियम (Prince William) आणि त्यांची पत्नी प्रिंसेस केट मिडलटन (Kate Middleton) हे पुढच्या तीन दिवसांसाठी

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा