CM Dash Board : शासनाच्या विभागांची माहिती 'सीएम डॅश बोर्ड'वर होणार उपलब्ध

मुंबई : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय, रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, 'स्वॅस' या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅश बोर्ड' संकेतस्थळ आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची 'स्वॅस' ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा. ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या माहिती प्रणालीद्वारे शासनाच्या प्रत्येक विभागाची माहिती पोर्टलवर सर्व सामान्य जनेला होणार आहे. तसेच याचा फायदा सर्व नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे संगणक आणि स्मार्ट फोन द्वारे घरबसल्या संकेतस्थाळाच्या आधारे बसल्या जागी तत्काळ माहिती ही उपलब्ध होते. तसेच या प्रणालीदची रचना ही विबागनिहाय पद्धतीने करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

Mumbai Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक पुन्हा एकदा उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने

Mumbai 26/11 attack : मुंबईतील २६/११ च्या नरिमन हाऊसची रेकी केल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या कुलाबा येथील नरिमन हाऊससह शहरातील काही

BMC Revenue: महापालिकेच्या महसूलात तबबल 815 कोटींनी होणार वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा महसूल वाढवण्याच्यादृष्टीकोनातून लिलाव पध्दतीने भूखंड भाडेकरारावर

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा

Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात लवकरच नर्सिंग कॉलेज होणार सुरु, महापालिकेच्यावतीने खासगी संस्थेची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या वांद्रयातील के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील