Kareena Kapoor : सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल करीना कपूर म्हणाली, " मी असे सीन करायला.... "

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्यातील स्पष्ट वक्तशीरपणा तिच्या चाहत्यांना नेहमी आवडतो. नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे किती महत्त्वाचे आहे किंवा नाही हे अवलंबून असल्याचे सांगितले. भारतीय सिनेसृष्टीत सेक्स किंवा लैंगिकता हा मानवी अनुभव म्हणून पाहिला जात नाही, असंही ती म्हणाली.



मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर (Kareena Kapoor) सेक्स एज्युकेशन वेब सीरिजसाठी द डर्टी मॅगझिनच्या मंचावर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गिलियन एंडरसनसोबतच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणाने बोलली. या मुलाखतीत गिलियनने करीनाला विचारले की, अशा सीनसाठी तू कोणती मर्यादा ठेवली आहेस. यावर करीनाने प्रतिउत्तर देत म्हणाली, “एखाद्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्स तितके महत्त्वाचे नसतात. त्याचप्रमाणे ही काही अशी गोष्ट नाही की कथा पुढे नेण्यासाठी ती दाखवलीच पाहिजे. मला माहितीये की ऑनस्क्रीन असे सीन्स करताना मी कम्फर्टेबल नसेन. मी याआधी कधीच तसे सीन्स केले नाहीत. असे सीन स्क्रीनवर दाखवण्यापूर्वी, तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिले पाहिजे.हे माझं मत आहे. याबाबतीत आम्ही पाश्चिमात्य देशांइतके मोकळे नाही आहोत”, असं करीना पुढे म्हणाली.





करीना कपूर मागील वर्षी अजय देवगणच्या सिंघम अगेनमध्ये दिसली होती. मात्र, यावर्षी तिचा 'दायरा' हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्याचे दिग्दर्शन 'राझी'च्या दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. या सिनेमात करीना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर