Yuzvendra Chahal New Inning : युजवेंद्र चहलच्या नव्या इनिंगला सुरुवात

नवी दिल्ली : भारतीय स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. चहलने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. तथापि, तो २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. पण या स्पर्धेतही तो फक्त बेंचवर बसून राहिला. आता तो आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना दिसणार आहे. याआधी युजवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतला. (RJ Mahavash ) ही लीग संपताच तो क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात जाईल. ज्यासाठी त्याने एका संघासोबत करार केला आहे. युजवेंद्र चहल पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२५ च्या हंगामात चहल नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना दिसेल. तो या संघाकडून यापूर्वीही खेळला आहे. त्याचा करार जून ते २०२५ हंगामाच्या अखेरीपर्यंत राहील. या काळात तो काउंटी चॅम्पियनशिप आणि वन-डे कपसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी तो २०२३ मध्ये या क्लबमध्ये सामील झाला होता. त्यानंतर त्याने नॉर्थम्प्टनशायरला डिव्हिजन टू मध्ये चौथ्या स्थानावर नेले आणि चार सामन्यात २१.१० च्या सरासरीने १९ चॅम्पियनशिप विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, क्लबसाठी त्याच्या लिस्ट ए पदार्पणात, त्याने केंटविरुद्ध १४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.(Yuzvendra Chahal New Inning)



नॉर्थम्प्टनशायरमध्ये पुन्हा सामील होण्याबद्दल युजवेंद्र चहल म्हणाला, 'गेल्या हंगामात मी येथे माझा वेळ खूप एन्जॉय केला होता, त्यामुळे परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये काही उत्तम लोक आहेत आणि मी पुन्हा त्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही हंगामाच्या शेवटी काही उत्तम क्रिकेट खेळलो, त्यामुळे आशा आहे की आम्ही ते पुन्हा करू शकू आणि काही मोठे विजय मिळवू शकू. दुसरीकडे, 'जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक या हंगामात नॉर्थम्प्टनशायरमध्ये परतत आहे याबद्दल मी खरोखर उत्साहित आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून