Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी

पुणे : पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीसाठी अनेक तरुणी - तरुणींनी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेवेळी लांबच लांब उमेदवारांची रांग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक तरुणी जखमी झाल्या. अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.



पुण्यात बुधवार १९ मार्च २०२५ रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात 'पुणे कारागृह महिला पोलीस' जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. या भरतीसाठी तीन हजार तरुणींनी गर्दी केली होती. पहाटेपासून तरुणी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात आल्या होत्या. भरती प्रक्रिया सुरू व्हायला वेळ होता म्हणून प्रवेशद्वार अर्थात गेट बंद ठेवण्यात आले होते. पण मुलींची गर्दी झाली. गेट उघडल्यावर पटकन आत जाऊन भरतीसाठी पहिला क्रमांक लावायचा या हेतूने तरुणींमध्ये धक्काबुक्की झाली. रेटारेटीचा ताण पडला आणि मैदानाचे गेट तुटले. गेट तुटल्यामुळे उघडले आणि मुलींनी एकदम मैदानाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक तरुणी जखमी झाल्या. चेंगराचेंगरी झाल्यामुळें अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.

'पुणे कारागृह महिला पोलीस' भरती २०२२ - २३ पासून रखडली आहे. एकूण ५१३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली. पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कारणामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत होता. यामुळे बुधवारी संधी मिळवण्याच्या धडपडीत तरुणींची गेटजवळ धक्काबुक्की झाली. यातून पुढे चेंगराचेंगरी झाली. पोलीस प्रशासनाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. यामुळेच चेंगराचेंगरी झाली, असा आरोप चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या महिला पोलिसांच्या कुटुंबियांनी केला. तर चेंगराचेंगरी झालेली नाही पण किरकोळ स्वरुपाची धक्काबुक्की, रेटारेटी झाली; असे पोलिसासांनी सांगितले.

भरतीसाठी आलेल्या अनेक तरुणींसोबत त्यांचे पालक आल्यामुळे गर्दी झाली होती. गेटजवळ थोडी धक्काबुक्की, रेटारेटी झाली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस प्रशासनाने लांबून आलेल्या तरुणी आणि त्यांच्या पालकांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचा उपयोग तरुणी आणि त्यांचे पालक घेऊ शकतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी