शिव ठाकरेची होणार 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

मुंबई : मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो. साधा स्वभाव पण पाहिजे तिथे सडेतोड बोलणार अशा शिव ठाकरेने मराठी बिग बॉसची ट्रॉफीही जिंकली होती.यानंतर तो 'खतरो के खिलाडी', 'बिग बॉस हिंदी'सह अनेक रिएलिटी शोजमध्ये दिसला.त्यानंतर आता शिव ठाकरेची आणखी एका रिएलिटी शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.


शिव ठाकरे रिअॅलिटी शो मास्टर आहे. जवळपास प्रत्येक शोमध्ये तो दिसला आहे. सध्या टीव्हीवर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' ची लोकप्रियता आहे. फराह खान शोची होस्ट आहे. रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे रिअल लाईफ शेफ या शोमध्ये परीक्षक आहेत. निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, गौरव खन्ना, फैजल शेख, अर्चना गौतम, चंदन प्रभाकर, अभिजीत सावंत हे स्पर्धक दिसले. काही दिवसांपूर्वीच शोमधून दीपिका कक्करने वैयक्तिक कारणांमुळे एक्झिट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, आता दीपिकाच्या जागी शिव ठाकरेची शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. शिवची चाहत्यांमधील लोकप्रियता पाहता तो मेकर्सने त्याला ऑफर दिली आहे.



शिव ठाकरे शोमध्ये येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपिका कक्कर शेवटच्या दिवशी भावुक झालेली दिसली. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिव ठाकरे जर आला तर काय रंगत येते हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


Comments
Add Comment

Sharad Kapoor: कधीकाळी खलनायकाच्या भूमिकांनी गाजवला पडदा, आज कामासाठी शरद कपूर यांचे भावनिक आवाहन!

90 च्या दशकातील आणि 2000 च्या सुरुवातीच्या हिंदी आणि बंगाली सिनेमातील धाकधूक वाढवणारा खलनायक, रांगडा गँगस्टर आणि

Nandish Sandhu Second Marriage: 'उतरन' फेम नंदीश संधू दुसऱ्यांदा बोहल्यावर; अभिनेत्री कविता बॅनर्जीशी बांधली लग्नगाठ

Nandish Sandhu Second Marriage: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदीश सिंग संधू याने वयाच्या 44 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. टीव्ही

Ramayana OTT Rights: 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम; OTT आणि टीव्हीवर कधी येणार? चाहत्यांची उत्सुकता

Ramayana OTT Rights: बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एका चित्रपटाची

Sharvari wagh new song: शर्वरीच्या 'पियाजी मैंने प्रेम मोल लिया' गाण्याची सोशल मीडियावर धूम; श्रेया घोषालच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मनं!

बॉलिवूडमध्ये सध्या एका गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता आयुष्मान खुराना

International Film Festival: 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ब्रिक्स देशांतील 21 चित्रपटांचे सादरीकरण

57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स देशांतील चित्रपटांचे विशेष दालन असणार आहे. या

Aniruddha Kavya Wedding: ग्रीसमध्ये अनिरुद्ध - काव्याचा साधा पण खास विवाह, सेल्फ रिस्पेक्ट विवाह म्हणजे काय?

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांचा विवाह ग्रीसमध्ये पार पडला. या