Nandish Sandhu Second Marriage: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदीश सिंग संधू याने वयाच्या 44 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. टीव्ही अभिनेत्री कविता बॅनर्जी हिच्याशी दुसऱ्यांदा नंदीश सिंग संधूने लग्नगाठ बांधली आहे. बंगाली रितीरिवाजानुसार नंदीशने दुसरे लग्न केले आहे. नंदिशची पत्नी त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. घटस्फोटानंतर त्याने दुसऱ्यांदा संसार थाटून तो आता स्थायिक झाला आहे.
14 नोव्हेंबर 2026 रोजी कोलकाता येथे एका पारंपरिक बंगाली समारंभात नंदिश आणि त्याची प्रेयसी कविता बॅनर्जी यांनी विवाह केला. आपले नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी दोघेही खूप आनंदी आहेत. नंदिश आणि कविता बॅनर्जी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 13 नोव्हेंबर पासून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. यात साखरपुडा, संगीत, हळदी यांचा समावेश होता.
Ramayana OTT Rights: 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक विक्रम; OTT आणि टीव्हीवर कधी येणार? चाहत्यांची उत्सुकता
Ramayana OTT Rights: बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे रणबीर ...
नवरदेवाच्या रूपात असलेल्या नंदिशने मरून धाग्याने भरतकाम केलेला सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. यात तो अतिशय देखणा दिसत होता. दरम्यान, कविता बॅनर्जी हिने देखील मरून आणि सोनेरी रंगाची बनारसी रेशमी साडी परिधान करून पारंपरिक बंगाली वधूचा लुक केला होता. अभिनेत्रीने सोन्याच्या दागिन्यांनी आपला वधूचा लूक पूर्ण केला. बहुस्तरीय हार, कंबरेचा पट्टा आणि कपाळावरील पट्टी अशा वधूच्या पोशाखात कविता अत्यंत सुंदर आणि देखणी दिसत होती. तिने हातांमध्ये बांगड्या आणि कानातलेही घातले होते. नंदीश आणि कविता यांनी त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या जोडप्याला सोशल मीडियावर भरभरून अभिनंदन आणि शुभेच्छा मिळत आहेत.
नंदीश संधूचे कविता बॅनर्जीसोबतचे हे दुसरे लग्न असून यापूर्वी या अभिनेत्याचे 2012 मध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईसोबत लग्न झाले होते. 'उतरन' या लोकप्रिय टेलिव्हिजन शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली, जिथे त्यांनी पडद्यावर पती-पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांनी 12 फेब्रुवारी 2012 रोजी राजस्थानमधील धोलपूर येथे लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. विभक्त झाल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी, नंदीश संधूने वयाच्या 44 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे.