सेल्फ रिस्पेक्ट विवाह म्हणजे काय?
तामिळमध्ये याला सुयमरियादै तिरुमणम असे म्हटले जाते. समाजसुधारक पेरियार ई. व्ही. रामासामी यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान चळवळीतून ही पद्धत पुढे आली. जातीव्यवस्था, सामाजिक विषमता आणि विवाहात धार्मिक अधिकाराला दिले जाणारे महत्त्व याला या चळवळीने विरोध केला होता.या विवाहात पुरोहिताची किंवा मोठ्या धार्मिक विधींची गरज नसते. जोडपे साक्षीदारांसमोर एकमेकांना वचन देते आणि हार किंवा अंगठीची देवाणघेवाण करते. यामध्ये दोघांची संमती आणि समानता याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.१९६७ मध्ये तामिळनाडूने हिंदू विवाह कायद्यात दुरुस्ती करून या विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे पारंपरिक विधींशिवायही असा विवाह कायदेशीर मानला जातो.
Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर
[caption id="attachment_1074372" align="alignnone" width="800"] 1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये ...
या जोडप्याच्या कुटुंबीयांकडून २१ नोव्हेंबर रोजी विवाह सोहळ्यानिमित्त एका रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अनिरुद्धने २०१२ मध्ये, धनुष अभिनीत '३' (3) चित्रपटातील 'व्हाय दिस कोलावेरी डी' (Why This Kolaveri Di) हे गाणे व्हायरल झाल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर त्याने 'कथी', 'वेदालम', 'मास्टर', 'बीस्ट', 'विक्रम', 'पेट्टा', 'दरबार', 'जेलर', 'वेट्टैयन' आणि 'कुली' यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे.