टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण IPLच्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर

मुंबई : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला यंदाच्या आयपीएल २०२५ च्या सिजनमधील कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे.अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या तक्रारींमुळे इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आले असल्याची माहिती समजतं आहे.


क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून इरफान पठाण कॉमेंट्री करायचे काम करतो. तो निवृत्ती नंतर कॉमेंट्री पॅनलचा नियमित सदस्य होता. मात्र, इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे. इरफानवर लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान आपला वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे. इरफान पठाण हा ऑन-एअर कॉमेंट्री करताना आणि त्याच्या सोशल मीडिया हँडलवर वैयक्तिक अजेंडाबद्दल बोलत असल्याबद्दल खूश नव्हते. बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, 'काही वर्षांपूर्वी इरफान पठाणचे काही खेळाडूंसोबत भांडण झाले होते. तेव्हापासून तो त्यांच्यावर आक्रमकपणे भाष्य करण्यापासून मागे हटला नाही.' इरफान पठाणवर सोशल मीडियावर त्या खेळाडूंना टार्गेट केल्याचा आरोप आहे.


त्यानंतर इरफान पठाणने २२ मार्च रोजी स्वतःचे YouTube चॅनल 'सिधी बात विथ इरफान पठाण' लाँच केले आहे. यावर तो गेमचे सखोल विश्लेषण करणार आहे. पण , इरफान पठाण कॉमेंट्री पॅनेलतून काढून टाकण्यात आलेला पहिला हाय-प्रोफाइल खेळाडू नाही. २०२० मध्ये, भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनाही काढण्यात आले होते. त्यांनी २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रवींद्र जडेजा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेच्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळले होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून