कल्याण आणि बदलापूर दरम्यान २९ - ३० मार्च रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग, कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी दिनांक २९/३०.०३.२०२५ (शनिवार / रविवार रात्री) रोजी अप आणि डाउन मार्गांवर, ६२/८८० किमी. वर असलेल्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या ४ गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यासाठी दोन रोड क्रेनचा वापर करून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.


हा ब्लॉक दिनांक ३०.०३.२०२५ (शनिवार/रविवारच्या मध्यरात्री) रोजी ०१.३० वाजता ते दिनांक ३०.०३.२०२५ (रविवार पहाटे) रोजी ०४.३० वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान परीचालीत करण्यात येईल.


ब्लॉकमुळे पुढीलप्रमाणे परिणाम होतील :


अप मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येतील


खालील गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील.


ट्रेन क्रमांक 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस,


ट्रेन क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस.


ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस.


ट्रेन क्रमांक 11140 होसपेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि


ट्रेन क्रमांक 22158 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस.


कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या फायद्यासाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल.


अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन


ट्रेन क्रमांक 22178 सिकंदराबाद -राजकोट एक्सप्रेस ०४.१० ते ०४.३० वाजेपर्यंत वांगणी स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.


ट्रेन क्रमांक 11022 तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस ०४.१७ ते ०४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.


उशिराने चालणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या/हॉलिडे विशेष गाड्या ऑपरेशनल गरजेनुसार वळवल्या जातील.


ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम :


ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.


उपनगरीय गाड्यांचा विस्तार / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन


परळ येथून २३.१३ वाजता सुटणारी (पीए३) परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यासाठी वाढवली जाईल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटणारी (बीएल६१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी (एस१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.


कर्जत येथून ०२.३० वाजता सुटणारी (एस२) कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरीजनेट केली जाईल आणि अंबरनाथ येथून ०३.१० वाजता सुटेल.


कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून ०४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०६.०८ वाजता पोहोचेल.


हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.


प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत