Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ मार्च २०२५
March 27, 2025 08:23 AM
पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र शततारका योग साध्य नंतर शुभ. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ६ चैत्र शके १९४६. गुरुवार दि. २७ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३७ मुंबईचा चंद्रोदय ०५.३८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०४.५१, राहू काळ ०२.१५ ते ०३.४७, प्रदोश, शिवरात्री, वारुणी योग, सूर्योदय ते सूर्यास्त, मधुकृष्ण त्रयोदशी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
मेष : समाजकार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल.
वृषभ : आरोग्य चांगले राहील. कष्टाचे फळ मिळेल
मिथुन : दिवसभरात घटनाक्रमामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह : सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येईल.
कन्या : जास्तीचे काम करावे लागेल.
तूळ : आरोप-प्रत्यारोप करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका.
वृश्चिक : वचन देताना दहा वेळा विचार करा.
धनू : कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
मकर : कोणत्याही कामाविषयी इतरांवर विसंबून राहू नका.
कुंभ : नातेवाईक यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.