Crime : बीडमध्ये मशिदीत स्फोट, स्फोटाआधीचे आरोपीचे रील Viral

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट झाला. दोन माथेफिरुंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी स्फोट प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.



बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात मध्यरात्री तीनच्या सुमारास मशिदीमध्ये दोन जणांनी स्फोट घडवून आणण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.



स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणात विजय गव्हाणेसह श्रीराम सागडे याला अटक केली आहे. 'शिस्तीत रहा बेट्या मी अंगार भंगार नाय रे', असं गाणं लावत आरोपीने रील बनवले. या व्हिडीओत आरोपीच्या हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे. स्फोट प्रकरणातील विजय गव्हाणे या आरोपीने आगीशी खेळ केल्याचे रीलमध्ये दिसत आहे. आता हे रील व्हायरल होऊ लागले आहे.
Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने