कल्याण आणि बदलापूर दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग, कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी दिनांक ०५/०६.०४.२०२५ (शनिवार / रविवार रात्री) रोजी अप आणि डाउन दक्षिण-पूर्व मार्गांवर, ६२/८८० किमी. वर असलेल्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या ४ गर्डर्सचे डि-लाँचिंग करण्यासाठी दोन रोड क्रेनचा वापर करून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.


हा ब्लॉक दिनांक ०६.०४.२०२५ (शनिवार/रविवारच्या मध्यरात्री) रोजी ०१.३० वाजता ते दिनांक ०६.०४.२०२५ (रविवार पहाटे) रोजी ०४.३० वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान परीचालीत करण्यात येईल.



ब्लॉकमुळे पुढीलप्रमाणे परिणाम होतील


अप मेल/एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येतील


खालील गाड्या कर्जत -पनवेल -दिवा मार्गे वळवण्यात येतील.




  • ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस,

  • ट्रेन क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,

  • ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस,

  • ट्रेन क्रमांक १११४० होसपेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि

  • ट्रेन क्रमांक २२१५८ चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस.


कल्याण येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या फायद्यासाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल.



अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन



  • ट्रेन क्रमांक २२१७८ सिकंदराबाद -राजकोट एक्सप्रेस ०४.१० ते ०४.३० वाजेपर्यंत वांगणी स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.

  • ट्रेन क्रमांक ११०२२ तिरुनेलवेली -दादर एक्सप्रेस ०४.१७ ते ०४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्टेशनवर नियंत्रित केली जाईल.


उशिराने चालणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या/हॉलिडे विशेष गाड्या परिचालन गरजेनुसार वळवल्या जातील.



ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम


ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.



उपनगरीय गाड्यांचा विस्तार / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन



  • परळ येथून २३.१३ वाजता सुटणारी (पीए३) परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यासाठी वाढवली जाईल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजता सुटणारी (बीएल६१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बदलापूर लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी (एस१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

  • कर्जत येथून ०२.३० वाजता सुटणारी (एस२) कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरीजनेट केली जाईल आणि अंबरनाथ येथून ०३.१० वाजता सुटेल.

  • कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून ०४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०६.०८ वाजता पोहोचेल.


हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.


प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि

व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले

Crime News : खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; दोन अल्पवयीनांसह चौघांना बेड्या

मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १४

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! CSMT नंतर आता ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर 'डीमार्ट'तर्फे अत्याधुनिक आणि झक्कास स्वच्छतागृहे सुरू

मुंबई : प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

नायगाव लोकलमधील छेडछाड प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; महाराष्ट्र पोलिसांना 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून खाली ढकलल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय तरुणीच्या प्रकरणाची

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या