IPL 2025 Points Table: आयपीएलच्या पॉईंट्सटेबलमध्ये कोण अव्वल, कोण तळाशी...घ्या जाणून

मुंबई: आयपीएल २०२५मध्ये शनिवारी झालेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला २५ धावांनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला केएल राहुल त्याने ५१ बॉलमध्ये ७७ धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला ५० धावांनी हरवले. यात जोफ्रा आर्चरने ३ विकेट घेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. या दोन्ही सामन्यात यजमान संघाचा पराभव झाला. यासोबतच दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.


चेपॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १८३ धावा केल्या होत्या. केएल राुलने संघासाठी सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने ७४ धावांत ५ विकेट गमावले होते. धोनी जेव्हा क्रीझवर आला तेव्हा सीएसकेला ५६ बॉलमध्ये ११० धावा हव्या होत्या. एमएस धोनीने ३० धावा केल्या मात्र यासाठी २६ बॉल वापरले. सीएसके आपल्या आव्हानापासून २५ धावा मागे राहिली.


दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ धावा केल्या. यशस्वी जायसवालने ६७ आणि रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने आपले २ विकेट पहिल्याच षटकांत गमावले होते. नेहल वढेराने सर्वाधिक ६२ धावा केल्या मात्र पंजाबच्या विजयासाठी या पुऱ्या पडल्या नाहीत. पंजाबला १५५ धावाच करता आल्या.


दिल्ली कॅपिटल्स विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी तीन सामने जिंकले असून त्यांचे ६ गु आहेत. तर पंजाब किंग्सचा संघ पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थानने पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्याने त्यांनी मोठी झेप घेतली आहे. राजस्थान ९व्या स्थानावरून ७व्या स्थानावर आला आहे. त्यांचा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. तर चेन्नई सुपर किंग्स८व्या स्थानावरून ९व्या स्थानावर आले आहेत. सगळ्यात खालच्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद आहे त्यांनी ४ पैकी एकच सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ  ८व्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून