मुंबई महापालिकेवर अखेर २३ वर्षांनी अंतर्गत कर्जातून रक्कम काढण्याची वेळ

तब्बल १२ हजार कोटींचे उचलणार कर्ज


पुढील २० वर्षांकरता ९ टक्के व्याज दर आकारणार


मुंबई : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अर्थसंकल्पाचा आकडा वाढवून तसेच आकार फुगवण्यासाठी आजवर अंतर्गत कर्जाचा उल्लेख केला जात असला तरी प्रत्यक्षात या अंतर्गत कर्जाची रक्कम हस्तांतरण करण्याची वेळ महापालिकेवर आली नव्हती. परंतु तब्बल २३ वर्षांनी मुंबई महापालिकेला अंतर्गत कर्जातून रक्कम उचलण्याची वेळ आली असून तब्बल १२,११९.४७ कोटी रुपयांचे कर्ज अंतर्गत निधीतून उचलण्यासाठी राज्य शासनाची परवानगी मागितली आहे. हे अंतर्गत कर्ज २० वर्षांसाठी असेल आणि ते ९ टक्के व्याजदराने घेतले जाणार आहे. सन २००२ मध्ये महापालिकेला अशाप्रकारे अंतर्गत कर्जाद्वारे निधी उपलब्ध करून घ्यावा लागा होता, त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये अंतर्गत कर्ज घेण्याची वेळ आली आहे.


शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अर्थसंकल्प 'अ', 'ब' आणि 'ई' च्या बाबतीत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण २७.४७९.२५ कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित असून या आर्थिक वर्षात विशेष प्रकल्पाकरिता प्राप्त होणारे अनुदान, विशेष निधीतून अंशदान, महसुली लेख्यांतून अंशदान व इतर भांडवली प्राप्ती अशाप्रकारे एकूण १५.३५९.७८ कोटी रुपयांची भांडवली प्राप्ती अपेक्षित आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपेक्षित असलेला २७.४७९.२५ कोटी रुपयांचा भांडवली खर्च भागविण्यासाठी अर्थसंकल्प अ करता कमी पडणारी १२.११९.४७ कोटी इतकी रक्कम उपलब्ध करण्याकरिता अंतर्गत्त कर्ज उभारणीची आवश्यकता आहे, असे नमुद केले आहे.


महानगरपालिकेच्याच अंतर्गत निधीतून कर्ज उभारणी केल्यास, हे कर्ज उभारणीकरीता अथवा कर्ज परतफेडीकरिता महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त प्रशासकीय खर्च सोसावा लागत नाही. तसेच, इतर कोणत्याही बाह्य संस्थेकडून कर्ज घेतल्यास, रेटिंग चार्जेस, अरेंजर्स कॉस्ट, स्टॅम्प ड्युटी, लीड अरेंजर्स फी यासह विविध बाबीसाठी कर्जाच्या रकमेच्या सुमारे ३ ते ४ टक्के इतका अतिरिक्त प्रशासकीय खर्च सोसावा लागतो त्यामुळे महानगरपालिकेच्या दृष्टीने भांडवली कामांचा खर्च भागविण्याकरिता अंतर्गत निधीतून कर्ज उभारणी करणे किफायतशीर ठरते,असेही नमुद केले आहे.



राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव


मुंबई महापालिकेच्यावतीने तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी ५९,९९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना त्यात ११,६२७.५४ कोटी रुपयांचे तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाची अर्थात अंतर्गत कर्जाची शिफारस केली. तर त्यानंतर सुधारीत अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये हा निधी १२,११९.४७ कोटी रुपये एवढी दर्शवली होती. मात्र आजवर अंतर्गत कर्जाच्या आधारे अर्थसंकल्पाचा आकडा वाढवला जात असला तरी प्रत्यक्षात कधी या कर्जाची गरज भासली नव्हती. परंतु महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा भांडवली खर्च भागवण्यासाठी १२,११९.४७ कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज उभारुन त्याद्वारे निधीचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेत याबाबत राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.